राष्ट्रवादी – भाजपाची तालुक्यात छुपी ‘अभद्र’ युती – उदयकुमार आहेर

0
15

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुक रणधुमाळीत उदयकुमार आक्रमक होत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या छुप्या युतीवर हल्ला चढवला. अश्विनी आहेर यांच्या प्रचारार्थ उदयकुमार आहेर यांनी प्रचार सभेत तुफान फटकेबाजी केली. राष्ट्रवादीची माघार म्हणजे तालुक्यात भाजपा राष्ट्रवादी नेत्यांची मिलीभगत आहे यांची अभद्र युती तालुक्याचे वाटोळे करेल यांच्यापासून सावध रहा शिवसंग्रामचा नगरपंचायतमध्ये प्रवेश गरजेचा असून यांना लगाम अन तालुक्यातील विकास यासाठी शिवसंग्रामचा उमेदवार गरजेचा आहे, असे आहेर म्हणाले.

भाजपवाशी झालेले जितेंद्र आहेर यांच्यावर देखील प्रश्नांची सरबत्ती करत टीकास्त्र सोडले,या वॉर्डचा विकास झाला नाही, देवळ्याचे लोक शिरपूर पॅटर्न बघायला जाता मात्र मी शब्द देतो आपले वॉर्ड क्रमांक 4 हे बघायला शिरपूरचे लोक येतील.

शहरातील रस्ते भयंकर आहेत, विकासाच्या बोंबा आहेत, स्मारकासमोरील रस्त्यावर दोन महिन्यांत खड्डे पडले, आम्ही काय काम केले विचारता त्यांना सांगतो देवळा शहरात पहिला काँक्रेट रस्ता मी केला, शहरातील गॅस कनेक्शन मी आणलं आहे. लोक कसे जगतील याकडे लक्ष द्या तुम्ही त्यांच्या दशक्रिया विधीची व्यवस्था नका करू, मी शहराला साडे चार कोटींची पाणीपुरवठा योजना आणली.
मी जे बोलतो ते खोट असेल तर भाजप नेतृत्वाने समोर यावं जनतेसमोर चर्चेला बसावे मी तयार आहे. रामेश्वर धरणाची पाणी पुरवठा योजना चुकीचीच आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्यात आला. गोरगरिबांना त्रास आम्ही देत नाही, टपऱ्या बांधण्यासाठी लाख रुपये घेतले गरिबांना कर्जबाजारी केले. असे अनेक आरोपांच्या फैरी झाडत केदा आहेर यांना लक्ष केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here