महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याचे सावट ; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

0
13

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारत प्रजासत्ताक दिन जोमात साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका (Drone Attack Alert) व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करू शकतील अशी शक्यता काही रीपोर्टमधून समोर आली आहे. देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच दुसऱ्या बाजूला याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आलीय की महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचं. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. राज्य सरकार नेमकं काय यंत्रणा राबवणार याकडे लक्ष लागून आहे.

सुरक्षा यंत्रणेच्या हाती डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण लागले आहे यात, जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सतत सतर्कतेची सूचना देत असतात. तपास यंत्रणांना नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की, डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत. यामुळे देशात दुफळी निर्माण करण्याचा डाव उधळण्याचे काम सुरक्षा यंत्रणेच्या हाती आहे.

राज्यात अँटी ड्रोन यंत्रणाच नसल्याने
राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी लागणार आहे. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्याचा गृहविभाग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणं व सतर्क राहणे गरजेचे आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here