द पॉईंट प्रतिनिधी : भारतातील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता अद्याप तरी धूसर दिसत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल वरील एकसाईझ ड्युटी कमी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांना इंधनावरील दर कमी होण्याची शक्यता धूसर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सध्या भारतात इंधनाचे दर हे अस्मानाला गवसणी घालत आहेत, असे म्हटले तरी चालेल. भारतात सध्या पेट्रोल – डिझेल या सर्वांवरील दर हे १०० रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे इंधनावरील कर कमी करण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. आज इंधनाच्या दराने सामान्य माणसाचे कंबरडे पुरते मोडले आहे. त्यामुळे इंधनाचे दर तरी किमान कमी व्हावेत अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त केली जात असताना, केंद्रित अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्पष्टीकरणाने, सर्वांचाच पुरता हिरमोड झाला आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांना सध्या तरी इंधनाचे दर कमी होण्याची वाटच पाहावी लागणार आहे.
पेट्रोलचे दर सध्या लिटरमागे जवळपास ११० रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचले आहेत. तर डिझेल चे दर हे ९६ रुपयांच्या जवळ आहेत. त्यामुळे आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्य नागरिकांच्या कमरेत हे दणका देण्यासारखेच आहे.
कोरोनाने आधीच सर्वांची वाताहात केली असतांना, इंधन दराने देखील पुरता हिरमोड केला आहे. भारतात इंधनाचे दर हे कधी नव्हे इतके १०० रुपयांच्या पार गेले आहेत. आणि येत्या काळात इंधनाचे दर १५० रुपयांजवळ जाऊन पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामान्यांना हा इंधन दरवाढीचा जाच कमी होईल, याची शक्यता कमीच आहे.
आज जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर हे प्रति बॅरल ६५ डॉलर इतके आहेत. आणि भारतात त्या हिशोबाने इंधनाचे दर हे सामान्यांना झटका देणारे आहेत.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्पष्टीकरणानंतर इंधन दर कमी होण्याची शक्यता देखील मावळली आहे. कोरोनाच्या हाहाकाराने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. भारतात प्रत्येकाला मोफत कोरोना लस दिली जात आहे. त्यामुळे केंद्र शासनाद्वारे इंधन दरवाढ थांबवण्याची अथवा कमी करण्याची शक्यता खूप कमी आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
त्यामुळे इंधन दरवाढ थांबण्याची अथवा, इंधन दर कमी होण्यासाठी नागरिकांना मोठी प्रतीक्षा करावी लागेल हेच स्पष्ट होते आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम