देवळा प्रतिनिधी : लोहोणेर, गिरणा नदी पुलाखाली, देवळा येथे मटका जुगार व सोरट जुगार अशा दोन कारवयांमध्ये एकूण 14,750/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदार-कांगने यांचे मार्गदर्शन व आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन होणेसाठी तसेच अवैध गुटखा, मद्य व अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पथकाने देवळा गावातील लोहोणेर येथे गिरणा नदीचे पुलाखाली मटका जुगार व सोरट खेळविणाऱ्यांवर कारवाई केली.
अपर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे दि. 06/01/2022 देवळा पोलीस ठाणे हद्दीतील लोहोणेर येथील गिरणा नदीचे पात्रात मटका जुगार खेळविणारा इसम नामे चिंधा भिका जाधव, वय 47, रा. ठेंगोडा, ता देवळा जि. नाशिक, याचे ताब्यात एकूण 9450/ रुपये किमतीचा कल्याण मटका जुगाराचा मुद्देमाल मिळून आला. तसेच त्याच ठिकाणीचे दुसऱ्या कारवाई दरम्यान सोरट जुगार खेळविनारा इसम नामे संदीप सोमनाथ राजभोज, वय 31, रा खामखेडा ,ता. देवळा, जि. नाशिक याचे ताब्यात एकूण 5300 रुपये किमतीचे सोरट जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम मिळून आले.
एकूण 14750/ रुपये किमतीचा मटका जुगार व सोरट जुगाराचा मुद्देमाल श्रीमती माधुरी केदार-कांगणे यांचे विशेष पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान मिळून आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार- कांगणे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पथकातील पोलीस नाईक रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, संदीप हांडगे पोलिस कॉन्स्टेबल कुणाल वैष्णव यांनी सदरची कामगिरी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम