द पॉईंट नाऊ : राज्यात कोरोनामुळे महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असतांना लसीकरण देखील जोमाने सुरू आहे. दिवसभर मोल मजुरी करत असल्याने अनेक नागरिकांना कष्टकऱ्यांना लस घेणं कठीण होत असते. मात्र खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रात्री उशिरा लसीकरण सुरू आहे.
खर्डे परिसरातील अनेक नागरिक सध्या शेतातील कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना सोयीचे व्हावे म्हणून सर्व नियमांचे पालन करून आरोय केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी देवळा तालुक्याचे सरचिटणीस मुन्ना जाधव यांच्यासह अन्य युवकांच्या मदतीने लसीकरण करून घेण्यास पुढाकार घेतला आहे. रात्रीचे होणारे लसीकरण बघून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोग्य यंत्रणेच्या या प्रयत्नांना नागरीकांनी देखील साथ देणे गरजेचे आहे.
लसीकरणावेळी डॉ.पाटील, सिस्टर निकम, आशा वनिता खैरनार, वंदना पवार, भूषण(मुन्ना) जाधव, बाळू गवळी, पठाण जाधव, दादाजी माळी, समाधान जाधव, दिनेश पवार आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम