रुपाली कदम
द पॉईंट नाऊ : बापरे ही महिला ४ वर्षापासून झोपली नाही. यावर विश्वास बसणार नाही, पण ही खरी गोष्ट आहे. या महिलेला झोपेच्या गंभीर आजाराने त्रस्त केल्याची माहिती समोर आलेली आहे. ३९ वर्षाची महिला ‘पोलिश’ या दुर्मिळ आजाराने त्रस्त झालेली आहे. त्यामुळे तब्बल ४ वर्ष ही महिला झोपली नाही.
या महिलेचे नाव मालगोर्झाटा स्लिविन्स्का आहे. हिचे रात्री झोप येत नसल्याने डोळे थकतात व डोळेदुखीचा भयानक त्रास होतो. डोळ्यांची यंग होते व भयानक थकवा जाणवतो. या आजाराने तीच आयुष्य बिघडले आहे. आरोग्याचेही भरपूर नुकसान होत आहे. तीने शॉर्ट टर्म मेमरी गमवली आहे. हातातली चांगली नोकरीही तिला गमवावी लागली आहे. घरात कुटुंबामध्ये संबंध खराब होत असल्याचे सांगितले आहे.
२०१७ मध्ये हा आजार वाढला व हळूहळू झोप गायब झाल्याचेही सांगितले. झोप लागण्यासाठी नाना प्रकार केले पण त्याचा काही उपयोग नाही झाला. झोपेच्या गोळ्याही घेवून पाहिल्या असता याचाही काही जास्त उपयोग झाला नसल्याचे सांगितले आहे. पुढे मनोसपचारांची मदत घेतली, व झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर या महिलेला अंमली पदार्थाचे व्यसन जडले.
औषधे बंद झाल्यावर तिला २ आठवडे झोप लागली नाही. व सोम्निफोबिया हा आजार असल्याचे पोलंडमधील डॉक्टरांच्या लक्षात आले. उपचार सुरू आहेत व व आता तिला २,३ आठवड्यातून झोप लागत असल्याचे सांगितले आहे. व व्यायाम आणि योगाने तिची नोकरीही तीने मिळविली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम