या बँकेची मोठी घोषणा ; ग्राहक ऑफलाईनही करू शकणार पैसे ट्रान्सफर

0
40

रुपाली कदम,
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बऱ्याचदा ग्राहकांना इंटरनेटमुळे पैसे ट्रान्सफर करण्यात अडचणी निर्माण होतात. इंटरनेट स्पीड कमी असले कि पैसे पाठवता येत नाहीत. बऱ्याच लोकांना या समस्यांना सामोरे जावे लागते जास्त करून ग्रामीण लोकांना. यावर आरबीआयने चांगले सोल्युशन काढले आहे. हि दिलासादायक बातमी म्हणजे ग्राहकांना आता ऑफलाईन पैसे ट्रान्सफर करता व घेता येणार आहेत.

RBI ने सोमवारी ऑफलाईन डिजिटल पेमेंट विषयी एक रूपरेषा जारी केलेली आहे. ऑफलाईन पैसे तुम्ही १० वेळा पाठवू शकता व पैसे पाठवण्यासाठी २०० रुपयांचे लिमिट असेल असे एकूण तुम्ही २ हजार रुपयांपर्यंत ऑफलाइन पैसे पाठवू शकता. RBI ने ऑफलाइन पेमेंट ला मंजूरी दिली आहे.

प्रत्येक व्यवहारात २०० रुपयांची मर्यादा आहे. असे १० वेळा व्यवहार करू शकता. ही सेवा सप्टेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत देशात काही ठिकाणी सुरू करण्यात आलेली असल्याचे सांगितले आहे. ऑफलाइन पेमेंट असल्यामुळे तुम्हाला SMS जरा उशिरा येईल अशी माहिती दिली.

केंद्रीय बँकेचे म्हणणे –

ऑफलाइन पेमेंटमुळे ग्रामीण भागातील लोकांना व ज्या ठिकाणी इंटरनेट खराब आहे, त्या ठिकाणच्या लोकांना डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल व डिजिटल व्यवहार सुरू राहतील या हेतूने व पैसे पाठवताना लोकांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही या दृष्टीने ही सेवा ग्राहकांसाठी आणलेली आहे. यामध्ये ग्राहक कार्ड, मोबाईल वॉलेट व मोबाईल डिव्हाईस चा देखील वापर करू शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here