मुंबई प्रतिनिधी : वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आलेत. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अ-कृषी आणि तंत्रनिकेतकन महाविद्यालय बंद राहणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली . तसेच सर्व विद्यापीठांच्या परिक्षाही ऑनलाईनच होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी विद्यार्थांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे सांगित ते म्हणाले, आज झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व अ-कृषि विद्यापीठे, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालय, स्वयंम अर्थसहाय्य विद्यापीठे आणि महाविद्यालय, तंत्रनिकेतनचे वर्ग १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वी ज्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू होते त्याच पद्धतीने सुरू राहिल अशी भूमीका सर्व विद्यापीठांनी घ्यावी असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उदय सामंत यांनी काल सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात त्यांनी कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला, विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली असल्याची माहिती दिली होती. यानंतर आज झालेल्या बैठकीत महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
English madhey pnn post Kara please