देवळा प्रतिनिधी : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी बाजार समितीने पेमेंट संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कांदा विक्रीचे पेमेंट आता पर्यंत व्यापारी खळ्यावर मिळत होते ते आता बाजार समितीच्या कार्यालयातच मिळणार असल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. ( दि. ३) जानेवारी पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी देखील होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांनी दिली.
बाजार समितीचे सभापती केदा आहेर, उपसभापती संजय चंदन, व्यापारी संचालक संजय शिंदे, रमेश मेतकर, सचिव माणिक निकम तसेच कांदा खरेदीदार व्यापारी यांच्या संयुक्तिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .
देवळा बाजार समितीत शेतमाल विक्रीचे पेमेंट शेतकऱ्यांना रोख स्वरूपात दिले जाते. मात्र काही शेतकरी व व्यापारी संगनमताने काही पेमेंट रोख व उर्वरित पेमेंट उधार स्वरूपात करत असल्याच बाजार समितीच्या निदर्शनास येत होते. सुरवातीला व्यापारी व शेतकरी यांच्या संगनमताने झालेला हा व्यवहार नंतर तक्रार स्वरूपात पुढे येत असल्याने आता या गोष्टींना आळा बसणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम