बेज येथील महात्मा फुले विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
37

जगदीश पवार

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (कळवण) : कळवण तालुक्यातील बेज येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल पी.एम यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून अनोखी मानवंदना दिली. मुख्याध्यापक बागुल पी.एम यांनी मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका मीरा आहेर यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक खरे आर.डी., शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here