डॉ. आहेर यांच्या हस्ते मुलूकवाडी-वार्षी रस्ता कामाचा शुभारंभ

0
41

देवळा प्रतिनिधी : वाखारी गटातील हनुमंत पाडा व वार्षी येथे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून वार्षि मुलुकवाडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन व मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत हनुमंत पाडा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याने त्यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर हे उपस्थित होते पाणीपुरवठा योजनेमुळे येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटल्याने उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांनी वार्शी- मुलुकवाडी रस्ते कामाची देखील लवकरच सुरुवात होऊन ते पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला, सदर कार्यक्रमात सरपंच बळीराम वाघ, माजी सरपंच भास्कर माळी, गोविंद सोनवणे, खेमराज सोनवणे, शांताराम पवार, आप्पा पवार, भाऊसाहेब सावकार, बाळासाहेब रणधीर, केशव पवार, प्रमोद पवार, शरद पवार, धना पवार, जगन्नाथ पवार, दादाजी सोनवणे, हरी पवार, रोशन सोनवणे, राहुल पवार, गणेश सोनवणे, श्रावण सोनवणे, पुंजाराम निरभवणे, देविदास जाधव, प्रभाकर वाघ, विश्वास वाघ, बाळू सोनवणे, अशोक पवार, भिला पवार, समाधान माळी, राजू वाघ, शरद वाघ, सुनील वाघ, जंगलु माळी, चेतन माळी, श्रावण शेवाळे, शरद सावकार, दादाजी पवार, मोहन पवार, रायबा वाघ, लक्ष्मण माळी, कृष्णा गांगुर्डे, प्रकाश निरभवणे, साहेबराव वाघ, लखा माळी, रामचंद्र सोनवणे, सोमनाथ पवार, सोनू पवार, अमोल जाधव, अमोल माळी, विनोद बागुल, भाऊसाहेब वालदे, ग्रामविस्तार अधिकारी राजश्री देसले, ठेकेदार सचिन आहेर तसेच शिक्षक वृंद व स्थानिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व आभार शिक्षक संदीप शिरसाट यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here