नितीन फंगाळ
चांदवड : विद्यालयात बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बैरागी के. जी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयातील काही मुलींनी सावित्रीबाई यांची वेशभूषा करून त्यांचा जीवनपरिचय करून दिला. विद्यालयातील उपशिक्षिका पवार, जाधव यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याची माहिती दिली. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा बैरागी के. जी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शेळके डी.बी, सोनवणे डी. आर, बिडगर एस्स पी, पाटील व्ही. एस्, वाघचौरे एस् .के, ठाकरे पी. आर, रसाळ भाऊसाहेब, उघडे के. के, किशोर शिंदे, या सर्वाचे सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम