देवळ्यात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आदर्श प्राध्यापिकांचा सन्मान

0
37

देवळा प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांना आदर्श प्राध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळा महाविद्यालयातील महिलांना आदर्श प्राध्यापिका पुरस्काराने सन्मानित करतांना उषाताई बच्छाव,वनिता शिंदे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा महाविद्यालयातील डॉ . प्रा. मालती हितेंद्र आहेर, डाँ. प्रा. जयमाला वसंतराव चंद्रात्रे, प्रा. दिपीका सुभाष शिंदे, प्रा.निलिमा यशवंत पाटील, प्रा. स्नेहल अशोक गवळी, प्रा.अश्विनी सुनील मुसळे यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श प्राध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे आयोजन जि प च्या माजी सभापती व देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उषाताई बच्छाव यांनी केले होते . कार्यक्रमास शहर अध्यक्षा वनिता शिंदे आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here