चांदवड प्रतिनिधी : चांदवड येथे आज गेल्या २१ वर्षांपासून श्री गजानन महाराज भक्त मंडळ, नाशिक व महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त यांच्या वतीने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली नाशिक ते शेगाव सायकल वारी ही आज चांदवड येथील प्रशासकीय इमारत येथे पोहचली असून, येथे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी सपत्नीक, तहसीलदार प्रदीप पाटील, चांदवड चे प्रथम नागरिक माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, चांदवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राठोड, जाधव वनविभागाचे अधिकारी, प्रांत कार्यालय ,तहसील कार्यलय, नगरपरिषद ,पोलीस प्रशासन यांचे अधिकारी कर्मचारी यांनी श्री गजानन महाराज भक्त मंडळ, यांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
सायकल रॅली चे महत्व २०२२ व्या वर्षी २२ वी फेरी, त्यात आपण औपचारिक रित्या केलेलं स्वागत, आमच्या हस्ते वृक्षरोपण होणारं कार्य, यातून आम्हला प्रेरणा मिळते व असेच सहकार्य आपण नेहमी आमच्या ग्रुपला करत चला व पर्यावरण जपत चला असा संदेश या ग्रुपने देत चांदवड येथे मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत येथे 4 ते 6 फूट उंचीचे वनजाती व शोभेची झाडे लावण्यात आली या झाडांसाठी ठिबकद्वारे पाणी सोडण्यासाठी नियोजन करण्यात आले, काळी माती, खत, झाडांना जाळी या सर्व गोष्टींचे नियोजन करून 200 इतक्या रोपांचे लागवड आज करण्यात आले.
भक्त मंडळ ५ जानेवारी रोजी संत नगरी शेगाव येथे पोहोचणार आहे . नाशिक येथील भांड न्यूज पेपर एजन्सीचे संचालक हभप प्रल्हाद महाराज (अण्णा) भांड यांनी सुरू केलेली ही सायकलवारी आता वटवृक्ष होऊ पाहत आहे. यंदाच्या सायकल वारीला २२ वे वर्ष असून १ ते ८१ सदस्य झालेले आहेत. भक्ती हीच शक्ती बरोबर पर्यावरण संवर्धनाचा जागर करत हरितक्रांतीचा संदेश देत पेट्रोल बचतीचा मंत्र, सायकल चालवणे आरोग्याला किती महत्वाचे आहे, हा संदेश देत सायकल रॅली १२० किलोमीटरचे अंतर रोज पार करत आहेत.
यावेळी तहसीलदार चांदवड, मुख्याथिकारी चांदवड, पोलिस निरीक्षक चांदवड, कैलास ढोमसे, संतोष जाधव चेतन नर्सरी, किरण गवळी यांनी आपले मोलाचे सहकार्य केले व आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी यांनी पुढील यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या व चहा, नाष्टा,श्री रेणुका देवीचे दर्शन करून जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम