शिवणकाम करणाऱ्याचे चार लाख रुपये रस्त्याने गहाळ

0
32

देवळा प्रतिनिधी : येथील शिवणकाम करणाऱ्या एकाचे मोटारसायकलवरून सटाणा रोडने जात असतांना चार लाख रुपये रोकड असलेली कापडी पिशवी रस्त्यात कुठेतरी पडून गहाळ झाली. देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशीकि, देवळा येथील शिवणकाम करणारे पवन दादाजी बच्छाव (वय ३६) रा. इंदिरानगर देवळा यांनी कार घेण्यासाठी बजाज फायनान्स कंपनीकडून मंजूर झालेल्या चार लाख २० हजार रुपयांपैकी १३ डिसेंबर रोजी बॅंक खात्यावरून रोख चार लाख रुपये चेक देवून काढले. तेथून सटाणा रोडवरील दुकानात कामानिमित्त थांबत सायंकाळी सटाणा रस्त्यावरील हॉटेल कडे मोटारसायकलने (एम एच ४१ व्ही ८६७०)जात असतांना रोकड रकमेची कापडी पिशवी हन्डलला अडकवलेली होती. परंतु यादरम्यान कुठेतरी सदर रोख चार लाख रु.रक्कम असलेली कापडी पिशवी गहाळ झाली. ही पिशवी नेमकी कुठे पडली याबाबत ज्ञात नसल्याने शोधणे अवघड जात आहे.

एवढी मोठी रक्कम गहाळ झाल्याने बच्छाव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ज्या कुणाला ही रक्कम सापडली असेल त्यांनी ही रक्कम परत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here