देवळा प्रतिनिधी : देवळा- कळवण रोडवर मोटरसायकल – हायवा यामध्ये अपघात घडला असून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. देवळा पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून दिलेल्या माहिती नुसार, देवळ्याहून कळवणकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच ४१ ए.वाय ९९४४, व हायवा क्रमांक जी.जे.१९ एक्स. ९१९९ व कळवण कडून देवळ्याकडे येणाऱ्या हायवा यामध्ये तालुक्यातील वरवंडी शिवारातील पाळेकर वस्ती या ठिकाणी समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली असून मयताचे नाव कृष्णा सोनू बडवे (वय-३०)गोसराने ता.कळवण येथील आहे.
घटनेबाबत वरवंडी येथील विलास धर्मा शिंदे हे आपल्या घरून शेताकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचा दिसला असता त्यांनी फोन वरून देवळा पोलिसात सदर अपघाताची खबर दिली असून देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा करून अपघातातील मृत व्यक्तीला देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास देवळा पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत कचरे, सुनिल पवार, नितीन साळवे करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम