द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जळगाव येथून एक मोठी बातमी आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करून संबंधित अज्ञात हल्लेखोर फरार झाले आहेत.
सध्या राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित सत्तेत आहेत. मात्र जळगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये बिनसलेले आहे. आणि याच वादातून रोहिणी खडसे यांच्यावर हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ल्याच्या या घटनेमुळे जळगाव भागात दहशत पसरली असून, खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये वादंग पेटलेला आहे. आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हा बँक माजी अध्यक्षा रोहिणी खडसे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यात वाद झाला होता. तेव्हाच ठिणगी पडली होती आणि त्याच कारणास्तव हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर बऱ्याच वेळा आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. त्यामुळे हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम