महाराष्ट्र कामगार महासंघ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मेतकर तर व्हा चेअरमन पदी भांदुरे

0
9
महाराष्ट्र कामगार महासंघ सभासदांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अजय मेतकर यांची तर व्हा चेअरमनपदी रत्ना भांदुरे यांच्या निवडी प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ व सभासद (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : महाराष्ट्र कामगार महासंघ सभासदांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अजय मेतकर यांची तर व्हा चेअरमनपदी रत्ना भांदुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

महाराष्ट्र कामगार महासंघ सभासदांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अजय मेतकर यांची तर व्हा चेअरमनपदी रत्ना भांदुरे यांच्या निवडी प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ व सभासद छाया सोमनाथ जगताप

महाराष्ट्र कामगार महासंघ सहकारी पतसंस्थेच्या सन २०२१ ते २७ साठीची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली . यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी अजय मेतकर यांची तर व्हा चेअरमनपदी , रत्ना भांदुरे , मानद सचिव म्हणून दत्ता सालमोठे यांची निवड करण्यात आली .

निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून कासार यांनी कामकाज बघितले . नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे हर्षित काटे, देविदास पैठणकर, राजू पठाण , सुनील बैरागी, पांडुरंग हांडगे ,प्रमोद जाधव, दीपक कापडणे, पुंडलिक ठेपणे, तुकाराम गावित, श्रद्धा जोशी , महेश जगताप ,भास्कर सोनवणे याप्रमाणे आहे .

याप्रसंगी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष लोंढे, रवींद्र काडके, सुरेश मोतीकर , वैद्य मॅडम,युवराज बैसाने, आर एल कुलकर्णी, विठ्ठल बागल, सुराशे , अनिल आहिरे , यू. टी. जगताप, सुनिल पाटील,रविंद्र ढाके,सुदाम पवार,योगिता ढोकणे. आदींसह झोन सचिव हर्शिद काटे ,भास्कर सोनवणे, गावित आदी पदाधिकारी उपस्थित होते . नवनिर्वाचित पदाधिकारी संचालक व संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here