देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील उमराणे येथून ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे शैलेंद्रकुमार सिंग यांचा नऊ लाख रुपयांचा २९४ क्विंटल कांदा गहाळ झाला असून , भाड्यापोटी दिलेले ५० हजार ४५२ रु.असे एकूण साडे नऊ लाख ६३ हजार १९४रुपयांची फसवणूक झाली असून , आरोपी कफिल अहमद अकिल ,रा उत्तर प्रदेश याच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत देवळा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, उमराने ता.देवळा येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शैलेंद्रकुमार नंदलाल सिंग रा.बर्जीगावं ह मु नाशिक ,पार्क साईट यांनी दि २२ / १०/ २०२१ ते२८ /११/२०२१ च्या दरम्यान त्यांच्या शिवपुरी मिराजापूर रोडलाईन या ट्रान्सपोर्टची गाडी क्रमांक यु पी २५/ डी टी २९०३ या गाडीमध्ये शैलेंद्र देवरे यांच्या कांदा गोडाऊन मधून एकूण २९४ क्विंटल २० किलो वजनाचा व ९ लाख१२ हजार ७४२ रुपये किमतीचा कांदा राज ट्रेडिंग कंपनी मेहंदीपूर पश्चिम बंगाल या कंपनीस पोहोच करण्यासाठी लोड करून आरोपीच्या ताब्यात दिला .
त्यानंतर आरोपीने सदरचा कांदा संबंधित कंपनीस पोहोच न करता मध्येच गहाळ करून विल्हेवाट केली .तसेच सदर गाडीच्या भाड्या पोटी मिळालेले ५० हजार ४५२ रुपये रोख रकमेचा अपहार करून असा ९ लाख ६३ हजार १९४रुपयांची ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शैलेंद्र कुमार सिंग यांची आरोपीने फसवणूक केली आहे .
या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलिप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कचरे करीत आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम