निर्बंध – न्यू इयर सेलिब्रेशन करता येणार नाही

0
53

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनाच्या नव्या प्रकाराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आता मुंबई येथे न्यू इयर च्या सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाचा नवा प्रकार ओमीक्रॉनचा प्रभाव महाराष्ट्रात वाढू लागला आहे. त्यात आता नाताळ आणि न्यू इयर येऊन ठेपला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध निर्बंध घातले आहेत.

मुंबईत तर न्यू इयर चे सेलिब्रेशन मोठ्या धूम धडाक्यात केले जाते. याच कारणास्तव गर्दी टाळण्याच्या दृष्टीने रात्री उशिरा मोठा निर्णय घेतला आहे. मोकळ्या किंवा बंदिस्त जागी कुठेही आता न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन साठी गर्दी करता येणार नाही आहे. यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय रात्री उशिरा मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात हे निर्बंध घालण्यात आले आहेत.

कालच राज्य सरकारने न्यू इयर आणि नाताळ च्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या वाढीमुळे नवीन नियमावली जाहीर केली आहे.

आता मुंबई महापालिकेने देखील थेट न्यू इयर सेलिब्रेशन साठी गर्दी करण्यावर बंदी घातली आहे. यामुळे नागरिकांचा हिरमोड जरी होणार असला, तरी कोरोना वाढीस प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने हे पाऊल मुंबई महापालिकेने उचललेले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here