भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले ; पायलटचा शोध सुरू

0
15

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे. राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे MIG 21 हे लढाऊ विमान कोसळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थामधील जैसलमेर येथे हे हवाई दलाचे MIG 21 विमान कोसळले आहे. यातील पायलटाचा शोध अद्याप सुरू आहे. विमान कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस दल आणि अधिकारी वर्ग घटना स्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आत्ताच काही दिवसांपूर्वी भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि भारतीय सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी मृत्यू मुखी पडले होते. ज्यामुळे सारा देश तर हळहळलाच, परंतु जगभरातून या घटनेसाठी दुःख व्यक्त करण्यात आले होते.

आता राजस्थान मध्ये देखील हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची ही घटना घडली आहे. आणि त्यातील पायलटचा शोध सुरू आहे. यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here