महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ; पुन्हा निर्बंध लागू

0
9

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्यात ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारचा शिरकाव झाल्यानंत राज्य सरकार सतर्क झाले आहे.

नाताळ आणि नव वर्षांमध्ये नागरिकांचा नेहमीच उत्साह दिसून येत असतो. त्याच पार्श्वभूमीवर आणि वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. अर्थात, आता पुन्हा आधी सारखी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जमावबंदी बरोबरच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांमध्ये बंदिस्त जागी 100 जणांना आणि खुल्या जागेत 250 जणांनाच एकत्र जमण्यास परवानगी असणार आहे. तर आत्ता कुठे सुरू केलेले रेस्टोरंट, जिम, स्पा यांना आता केवळ 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे.

राज्यात ओमीक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून, शासनाला सर्व गोष्टींचा आता काटेकोर विचार करावा लागत आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने रात्रीची जमावबंदी आणि नवीन नियमावली जाहीर केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here