ग्राहकांनी जागरूकता दाखवावी ; मुख्याध्यापक आहेर

0
21
देवळा येथे श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल मध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक डी इ आहेर समोर उपस्थित विद्यार्थी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : ग्राहकांनी जागरूक पणे अधिकारांचा वापर केला तर फसवणूक होण्याची भीती अशक्य असल्याचे मत मुख्याध्यापक डी ई आहेर यांनी आज देवळा येथे व्यक्त केले . श्री शिवाजी मराठा स्कूल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ते बोलत होते.

देवळा येथे श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल मध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक डी इ आहेर समोर उपस्थित विद्यार्थी छाया सोमनाथ जगताप

देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्व , त्याची उपयोगिता ,त्याचे सामाजिक जीवनावर होणारे परिणाम आदी बाबत डी वाय भदाणे , योगेश गोसावी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले.

याप्रसंगी पर्यवेक्षक ए के आहेर, वृक्षमित्र सुनील आहेर,सौ सुमन आहेर,किशोर पगार,निवृत्ती चव्हाण ,पी एम घुगे, सौ . काळे मॅडम , शैलेश खैरनार, श्रीमती .निकम मॅडम , हादगे मॅडम सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते . सूत्रसंचालन एस टी पाटील यांनी केले तर आभार श्रीमती एस एस आहेर यांनी मानले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here