देवळा प्रतिनिधी : दिल्ली येथे झालेल्या नेक्स्ट सुपर मॉडेल शो मध्ये नाशिक येथील रोहन सोनवणे ला नेक्स्ट सुपर मॉडेल २०२१ चा किताब बहाल करण्यात आला .
दिल्ली येथे झालेला नेक्स्ट सुपर मॉडेल शोसाठी मुंबई, दिल्ली,अरुणाचल प्रदेश, पुणे, फरीदाबाद, भोपाल, उत्तर प्रदेश, कोलकत्ता, हैद्राबाद आदी ठिकाणाहून ऑडिशन झाले होते . या ऑडिशन मध्ये नाशिक येथील रोहन सोनवणेची मिस्टर मिस नेक्स्ट सुपर मॉडेल शो साठी निवड झाली . या ‘किताब मुळे रोहनने महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्हाचे नाव रोशन केले. रोहनने मागच्या वर्षीचा मिस्टर इंडिया चा ‘किताब पटकवाला होता .
रोहन सोनवणे हा विठेवाडी येथिल ग्रामविकास अधिकारी नंदू सोनवणे यांचा मुलगा आहे . त्याचा ह्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम