बलात्काराच्या आरोपीस होणार थेट फाशी?

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आता अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद असणार आहे.

दिवसागणिक ऍसिड हल्ला, बलात्कार अशा घटना घडतच आहेत. विकृत लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य विधिमंडळात अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला किंवा बलात्कार करून हत्या करणाऱ्यास थेट मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या तरतुदीवर विचार केला जाणार आहे. याची तरतूद असलेला ‘शक्ती कायदा’ राज्य विधिमंडळात संमत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभरात बलात्काराच्या घटना मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना देखील खूप आहेत. या घटना कमी होत नाही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळात हा शक्ती कायदा संमत केला जाऊ शकतो.

या शक्ती कायद्याद्वारे 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करून खटला चालवला जातो. दुर्मिळात दुर्मिळ बलात्कार प्रकरण असेल, तर या कायद्यात मृत्यू दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 16 वर्ष वयाच्या खालील मुलीवर बलात्कार झाला, तर आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारा हा कायदा विधिमंडळात संमत केला जाणार आहे. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण असे हे पाऊल असणार आहे.

वाढत्या अत्याचाराच्या घटनांना यामुळे तरी निदान आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here