सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च अखेर ७० लाख २१ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन योगेश आहेर यांनी दिली. या संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे – भागभांडवल – ६९ लाख १२ हजार, निधी – ४ कोटी ५२ लाख, ठेवी – ३२ कोटी ४६ लाख, गुंतवणूक – १७ कोटी ११ लाख, कर्जवाटप – २० कोटी २८ लाख, खेळते भागभांडवल – ३९ कोटी ८ लाख, सीडी रेशो – ६२.४७ टक्के, थकबाकी – ७.२१ टक्के याप्रमाणे तर निव्वळ नफा ७० लाख २१ हजार रुपयांचा झाला आहे. यावेळी चेअरमन योगेश आहेर, व्हा. चेअरमन हिरामण आहेर, संचालक तुळशिराम आहेर, बाळासाहेब मगर, अतुल आहेर, नानाजी आहेर, नितीन नवले, सौ. लिना आहेर, सौ. वनिता शिंदे, पुंडलिक आहेर, शंकर बच्छाव, नानाजी आढाव, व्यवस्थापक प्रमोद देवरे, रोखपाल बापू आहेर, लिपिक रमेश जाधव आदींसह भिला सोनवणे, योगेश आहेर, तुषार मोरे, संदिप आहेर उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम