Deola | घरफोडीतील आरोपीला शोधण्यात देवळा पोलीसांना यश; रोख रक्कम हस्तगत

0
1
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील ज्ञानेश्वर नगर, वाखारी रोड येथे दि.१८ जुलै २०२४ रोजी झालेल्या जबरी घरफोडीतील आरोपीला शोधण्यात देवळा पोलीस पथकाला यश आले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व फिर्यादी घरमालकाला गुरुवारी दि. १३ रोजी ५ लाख रुपये परत करण्यात आले. या कामगिरीमुळे देवळा पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संगिता विकास ठाकरे (रा. ज्ञानेश्वर नगर, वाखारी रोड, देवळा ता. देवळा) हे कामानिमित्त नाशिक येथे सहपरिवार गेले असता दि. १८ जुलै २०२४ रोजी सकाळी सव्वा सात ते नऊ वाजेचे दरम्यान बंद घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरटयाने घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक यांना या घटनेची खबर दिली. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळ्याचे पोलीस उपनिरिक्षक दामोदर काळे यांनी सदर गुन्हयाचा तपास करून व अंगुलीमुद्रा तज्ञ तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्हयातील आरोपी जिमी विपिन शर्मा (रा. नंदुरबार) यास अटक केली असता त्याने सदर गुन्हयातील सोन्याचे दागिने हे दिल्ली येथे विकल्याचे कबूल केले. सदर दागिन्याचे मोबदल्यात ५,००,००० रूपये तसेच आरोपीने खरेदी केलेली नविन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. ही रक्कम गुरुवारी दि. १३ रोजी घरमालक संगिता विकास ठाकरे यांचे ताब्यात देण्यात आली अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोउपनि दामोदर काळे यांनी दिली.

Deola | देवळा-खर्डे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा मुख्यमंत्री यांचा १०० दिवसाचा कृती आराखडा अंतर्गत पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांचे सुचनेप्रमाणे कळवण न्यायालयात वेळोवेळी पाठपुरावा करून सदर गुन्हयातील किंमती मुद्देमाल ५,००,००० लाख रूपये रोख फिर्यादीस परत करण्यात आले. सदरच्या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या पथकाचे कौतुक केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here