सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन व नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांची टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील मोठ्या संख्येने संघांनी सहभाग नोंदविला. भावडे येथील एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या एकत्रित संघातील खेळाडू श्लोक आहेर, आयुष बागुल, सोहम कापडणीस, आयुष भदाणे, आयुष आहेर, अर्णव आहेर, आदित्य ढाकराव, यशराज पवार, ओम जाधव, योगीराज अहिरे, पुष्कर ठाकरे, सार्थक नांद्रे, अमोल गोरे, प्रणव अहिरे, खुशाल भामरे, वेदांग चिमनपुरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला. या विजयी संघातील खेळाडू आयुष बागुल, आयुष भादाने, आदित्य ढाकराव, खुशाल भामरे या खेळाडूंची मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. विजयी संघाला व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या संघाला क्रीडा शिक्षक मुद्दसर सय्यद, यज्ञेश आहेर, धनंजय परदेशी, निलेश भालेराव, ययाती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे तसेच सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम