देवळा नगरपंचायत निवडणुकीत 78.40 टक्के मतदान

0
156
देवळा येथे मतदानासाठी मतदान केंद्रावर लागलेली रांग (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 78 .40 टक्के मतदान झाले . ६३६७ मतदारांपैकी 4992 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . देवळा नगरपंचायतीच्या ११ प्रभागांसाठी झालेल्या ह्या निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

देवळा येथे मतदानासाठी मतदान केंद्रावर लागलेली रांग (छाया – सोमनाथ जगताप )

शहरातील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय तसेच जि.प. प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्रात मतदानाची सोय करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी मतदान केंद्रास सकाळी भेट देऊन पाहणी केली.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये 610 पैकी 529 ,
प्रभाग क्रमांक 2 मध्ये 484 पैकी 354 ,
प्रभाग क्रमांक 3 मध्ये 674 पैकी 491 ,
प्रभाग क्रमांक 5 मध्ये 721 पैकी 572 ,
प्रभाग क्रमांक 6 मध्ये 495 पैकी 365 ,
प्रभाग क्रमांक 7 मध्ये 660 पैकी 508 ,
प्रभाग क्रमांक 9 मध्ये 356 पैकी 288,
प्रभाग क्रमांक 11 मध्ये 648 पैकी 514,
प्रभाग क्रमांक 12 मध्ये 663 पैकी 534 ,
प्रभाग क्रमांक 15 मध्ये 625 पैकी 476 ,
प्रभाग क्रमांक 16 मध्ये 431 पैकी 357

कोणत्या वॉर्डात किती टक्के

वार्ड क्र:-१) ६१० पैकी ५२९ 87%
२)४८४ पैकी ३५४. 73.1%
३) ६७४ पैकी ४९२. 73%
५) ७२१ पैकी ५७२. 79%
६) ४९६ पैकी ३६५ 73.5%
७)६६० पैकी ५०७. 76.8%
९)३५६ पैकीं २८८. 80.8%
११)६४८ पैकी ५१४. 79.3%
१२)६६३ पैकी ५३४. 80.5%
१५)६२५ पैकी ४७६. 76.16%
१६)४३१ पैकी ३५७ 82.8%

अशा एकूण 4992 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here