सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कळसुबाई ट्रेकिंग शिखर गाठून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने याठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा झेंडा फडकविला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आयोजित कळसुबाई गिर्यारोहण व सांस्कृतिक आदानप्रदान शिबीर दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. या शिबिराला नाशिक, नगर, पुणे या तिन्ही जिल्ह्यातून १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Deola | अभाविपकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आहेर महाविद्यालयाचे प्राचार्यांना निवेदन
यामध्ये देवळा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सोनवणे कल्याणी, भामरे पल्लवी, सोनवणे ओम, पवार उमेश, पगार गौरव या पाच विद्यार्थ्यांसह नाशिक जिल्ह्याचे संघनायक म्हणून लेफ्टनंट बादल लाड हे सहभागी होते. यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले. कळसुबाई ट्रॅकिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, सचिव प्रोफेसर डॉ. मालती आहेर, उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर, डॉ.जयवंत भदाणे, दिनेश वाघमारे आदींनी अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम