सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवळा शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध शैक्षणिक समस्या तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर आहेर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. निवेदनाचा आशय असा की, अभाविपने गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर ‘प्रश्न शोध मोहीम’ हाती घेतली आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे असे या प्रश्न शोध मोहिमेच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे.
वेळोवेळी निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांच्या या समस्या व मागण्या आपणांसमोर मांडून सुद्धा या मागण्यांवर कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही किंवा यावर कुठलीही कार्यवाही देखील झाली नाही. तरी सदर निवेदनाद्वारे विद्यापीठ व शासन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात येत आहेत. पुढील सात दिवसांमध्ये सदर मागण्यांची पूर्तता न केल्यास अभाविप विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करेल.
Deola | आहेर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
विद्यार्थी हिताच्या मागण्या पुढीलप्रमाणे – पुनर्मूल्यांकनाच्या बदललेल्या निकषामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर बाधा येत आहे. ऑर्डिनन्स १८४ (ए) व (बी) यामध्ये झालेले बदल तात्काळ रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करण्यात यावे. पुनर्मुल्यांकन हे पूर्णवेळ व नियमित प्राध्यापकांकडूनच व्हावे, पेपर तपासणी काळजीपूर्वक व्हावी यात निष्काळजी दाखवणाऱ्या प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पुनर्मुल्यांकनाचे निकाल अर्ज केल्यानंतर १० दिवसात घोषित करण्यात यावे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त व अस्वायत्त महाविद्यालयांमध्ये 19 जुलै 2024 च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याच्या शासन निर्णयाची अनेक महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशा सर्व महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी,
तसेच विद्यापीठाने या विषयात नव्याने परिपत्रक जारी करून या योजने संदर्भातील तपशील अधिक स्पष्ट करण्यात यावा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दि. ३० डिसेंबर २०२४ रोजीचे क्र. ३१६/२०२४ या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, अहिल्यानगर व नाशिक उपकेंद्रे येथे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम, सभा, बैठका, निषेध व आंदोलने करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची आठ दिवस अगोदर पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे, ही जाचक नियमावली तत्काळ रद्द करण्यात यावी, विद्यापीठामध्ये तात्काळ पूर्णवेळ कुलसचिव आणि सर्व डीन नियुक्त करण्यात यावेत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार खुल्या विद्यार्थी परिषद निवडणुका आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याची घोषणा विद्यापीठाने करावी,
परीक्षा, पुनर्मुल्यांकन आणि निकाल – विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये सतत गोंधळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच लागलेल्या सत्र परीक्षांचे निकाल नीट न दिसणे, चुकीचे निकाल लागणे, उपस्थित असून देखील अनुपस्थित दिसणे, आधी उत्तीर्ण नंतर अनुत्तीर्ण दाखविणे, इत्यादी तांत्रिक समस्या निदर्शसनास आल्या आहेत. हे निकाल दुरुस्त करून त्वरित सुधारित निकाल लावण्यात यावे, छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या परंतु विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींमुळे छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन न झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क तात्काळ परत करण्यात यावे. उत्तर पत्रिकांचे छायांकित प्रत शुल्क १००/- रुपये प्रति पेपर एवढेच अकरावे. तसेच छायांकित प्रत सात दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर मिळावी. बॅकलॉग परीक्षा शुल्क हे प्रति विषय रु. २००/- पेक्षा जास्त नसावे, स्पर्धा परीक्षा किंवा सी.ए., सी.एस. इत्यादी परीक्षांच्या तारखा विद्यापीठ प्रशासनाने विचारात घेऊनच सत्र परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करावे.
एकाच तारखेला दोन परीक्षा (सत्र आणि स्पर्धा परीक्षा) येणार नाही याची काळजी घ्यावी,परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सत्र परीक्षेचा निकाल न लागल्यास परीक्षा विभागातील संबंधित (दंडात्मक, बडतर्फी) कारवाई करावी. परीक्षा अर्ज व परीक्षा यांमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी असावा, नापास झालेल्यांना पास करण्यासाठी लाच मागणे, कागदपत्रे लवकर मिळावेत यासाठी लाच घेणे असे अने व महाविद्यालय स्तरावर घडत आहेत. अशांवर त्वरित कारवाई करावी व विद्यापीठ म्हणून देखील लाचलु करावे, प्रत्येक वेळेस सॉफ्टवेअरमुळे निकालात होणारा गोंधळ लक्षात घेता तो टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वर्तमान फिटनेअर कार्यप्रणालीचा योग्य विचार करावा व स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी, गेल्या 2-3 वर्षा क्षा विभागाठील गोधळ वाढला आ निवाल, पुनर्मुल्यांकल आणि छायांकित प्रत विषयातील तक्रारी सतत वाढत आहेत त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा विभागाच्या गुणवत्ता तपासणीसाठी समिती गठीत करावी, अधिकाऱ्यांची निःपक्ष पाती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे. यावेळी कार्तिक शेवाळकर, सार्थक आहेर, उज्वल शिंदे, वैभव पवार, ऋषी आहेर, अलकेश गुंजाळ आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम