सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने मंगळवारी (दि.४) रोजी आधारभूत कींमतीत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. एनसीसीएफ या संस्थेमार्फत शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघ यांच्या वतीने देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघा मार्फत सोयाबीन, मुंग व उडीदचा शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत खरेदीचा येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची खरेदी करण्यात आली. या शुभारंभ प्रसंगी संघाचे चेअरमन संजय गायकवाड, संचालक चिंतामण आहेर, अमोल आहेर, सचिन सूर्यवंशी, हंसराज जाधव, बाळासाहेब मगर, डॉ किरण आहेर, भावराव नवले, नानाजी आहेर, विनोद देवरे, सुनील पवार, सचिव गोरख आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम