सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | युथ गेम कौन्सिल इंडिया यांच्यातर्फे झालेल्या १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट खेळात येथील कौस्तुभ देवा भामरे याने संघनायक म्हणून यशस्वी भूमिका पार पाडत प्रथम पारितोषिक मिळवून दिले. गोवा (म्हापसा) येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत त्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी यामुळे त्याला मिळाली आहे. नाशिक येथील उदोजी होरायझन स्कुलमध्ये तो शिक्षण घेत आहे. क्रीडाशिक्षक अमोल शेटे, प्रिया भावसार, प्राचार्या नेहा सोनवणे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम