
देवळा प्रतिनिधी : मंगळवार (दि.२१) रोजी होणाऱ्या देवळा नगरपंचायत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ११ मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदानासाठी ११ मतदान केंद्राध्यक्ष, ३३ मतदान अधिकारी, ११ मतदान कर्मचारी व तितकेच पोलीस कर्मचारी यांच्या नेमणुका करत सर्व मतदान केंद्रांवर मतपेट्या व साहित्यासह अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत.

सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांना यापूर्वीच प्रशिक्षण दिले आहे. ११ मतदान केंद्रांपैकी श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कुल मध्ये तीन, जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत पाच तर कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात तीन मतदान केंद्रे असणार आहेत. महिलांची ओळख पटविण्यासाठी पाच महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन झोनल ऑफिसर यांचे पर्यवेक्षण यात राहणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर याबाबतसतर्कता बाळगली जाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी.एच. देशमुख ,सहाय्यक निवडणूक अधिकारीतथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम