सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमानकारक शब्द वापरल्याच्या निषेधार्थ तसेच संविधानाच्या सन्मानार्थ देवळा येथे गुरुवारी (दि.२६) रोजी तालुक्यातील आंबेडकरी व संविधानप्रेमी नागरिकांनी निषेध मोर्चा काढून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, नायब तहसीलदार बबन अहिरराव यांना निवेदन सादर केले. निवेदनाचा आशय असा कि, केंद्रीय गृह मंत्री अमित शहांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान कारक शब्द संसदेमध्ये उच्चारून संविधानाचे जनक असणाऱ्या व्यक्तित्वाच्या प्रतिमेला इजा पोहचविण्याचे काम गृह मंत्र्यांनी केले असुन, यामुळे संपूर्ण भारतामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आर.एस.एस. आणि भाजपची विचारधारा ही नेहमीच देशाला तोडण्याचा विचार करतात. या अशा जातीयवादी मानसिकतेतुन असे विषारी विधान करून देशात बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रवृत्तीच्या मंत्र्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. हा मनुष्य समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. भारत हा देश सर्व धर्म समभाव जपणारा देश म्हणुन जगामध्ये मोठे नाव कमावत आहे आणि या भारताच्या अखंडतेला इजा पोहचविणारे काही लोक असे बेताल वक्तव्य करून भारताची अखंडता खंडीत करु पाहत आहेत. अशा शब्दात निवेदनात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परभणी जिल्ह्यात संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशी याचा निर्घृणपने पोलिस कोठडीत खुन करण्यात आला. हेच का तुमचे संविधानाप्रति प्रेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधानाच्या गप्पा मारतात.
Deola | देवळा येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिकमधील घटनेचा निषेध
संविधानाचा जयजयकार करतात आणि संविधान निर्मात्याच्या अनुयानांना पोलिस कोठडीत संपविण्याचे काम सुरु आहे. आर.एस.एस. व भाजपाची हीच रणनीती आहे का? सामाजिक तेढ निर्माण करून सलोखा बिघडविण्याचे काम आपल्या राज्यात सुरु केले आहे का? सुर्यवंशी यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व राज्याचे गृहमंत्री असणारे फडवणीस यांच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. तात्काळ या दोन्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर नगरसेवक कैलास पवार, भारतराज पवार, शांताराम पवार, योगेश पवार, कैलास पवार, किरण गांगुर्डे, दिनेश अहिरे, शांताराम बच्छाव, आप्पा केदारे, सुनील पवार, राजेंद्र जगताप, पुंडलिक केदारे, कल्पेश पवार, विलास माळी आदींच्या सह्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम