सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मेशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे (ठाकरे गट) योगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच सतीश बोरसे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी मंगळवारी (दि.२४) रोजी नूतन उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा सरपंच बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक बोलवण्यात आली. यावेळी सर्वानुमते उपसरपंच पदी ठाकरे गटाचे योगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी जे.आर शिंदे, माजी उपसरपंच सतीश बोरसे, शिल्पा अहिरे, अनिता शिरसाठ, दगुबाई शिरसाठ, लिलाबाई चव्हाण, समाधान गरुड, द्वारकाबाई सूर्यवंशी, शाहू शिरसाठ, तुषार शिरसाठ, गोरख बोरसे, निंबाबाई सूर्यवंशी, मनीषा कुवर, आदींसह निवृत्ती चव्हाण, धनंजय चव्हाण, प्रवीण चव्हाण, धना शिरसाठ, समाधान चव्हाण आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
Deola | प्रलंबित शेतरस्ता दावे तातडीने निकाली काढावे; शेतरस्ता समितीची मागणी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम