Deola | प्रलंबित शेतरस्ता दावे तातडीने निकाली काढावे; शेतरस्ता समितीची मागणी

0
15
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता दावे तातडीने निकाली काढण्यात यावे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२४) रोजी येथील निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा कि, शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावे, तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात, शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, शिव पानंद शेतरस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा, तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा, शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत, शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

Deola | वाखारी ते चिंचबारी रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांमुळे अपघात वाढले

दरम्यान, शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही परिहार्य बाब झाली आहे. शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता पेरणी अंतर्मशागत कापणी, मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी, शेती पुरक व्यवसाय, सर्प दंश, वीज पडणे, पुर येणे, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके. त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यात असून शेतमाल बाजारपेठेत पोचवण्यासोबतच विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारामाही दर्जेदार शेतरस्त्याची आवश्यकता असुन शेतरस्त्यांअभावी अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शासन निर्णयाची अंबलबजावणी करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावे. असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी भिका पवार, माणिक सूर्यवंशी, बापू सोनवणे, साहेबराव खोंडे, नितीन खोंडे, शिवाजी सोनवणे, जिभाऊ देवरे, सुभाष शिंदे, नानाजी सोनवणे, कैलास बडे, श्रावण सूर्यवंशी, भाऊसाहेब शिंदे आदींसह शेतशिवारात जाण्यास रस्ता नसलेले अन्याय ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार अहिरराव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपणास न्याय देण्याचे आश्वासन दिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here