सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत कळवण, सुरगाणा, बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव व नांदगाव या सात तालुक्यांच्या क्रीडास्पर्धा बागलाण तालुक्यातील दोधेश्वर आश्रमशाळेत संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कसमादे परिसर विकास मंडळ संचलित तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौ.सो.आहेर अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी किशोर माळी ८०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, अर्जुन पवार ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, कोमल खांडवी ६०० मीटर धावणे दुसरा क्रमांक व २०० मीटर धावणे तृतीय क्रमांक मिळवला.
Deola | कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृती सप्ताहानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन
या तिन्ही खेळाडूंची विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रिडा शिक्षक योगेश अहिरे, यशवंत चौरे व यांच्यासह शिक्षक व शक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कळवणचे प्रकल्प अधिकारी अकुनोरी नरेश, संस्थेचे अध्यक्ष आ डॉ. राहुल आहेर, उपाध्यक्ष डॉ. पोपट पगार, चिटणीस कृष्णा बच्छाव, खजिनदार रमेश शिरसाठ, संचालक विलास निकम, प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना सूर्यवंशी, पुष्पा देवरे,उज्वला भामरे, सुनीता चंदन, अधीक्षक मयूर देवरे, आशा बहिरम, आदींनी कौतुक केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम