सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | वाखारी ते चिंचबारी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील शिवाजी पवार यांनी केली आहे. देवळा तालुक्यातील वाखारी ते चिंचबारी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारकांना रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता असा संभ्रम निर्माण झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. देवळा व या परिसरातील नागरिकांना चांदवडला जाण्या येण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर वाहनधारक करीत असतात.
Deola | देवळा येथील कसमादे करियर व स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन शिबीर
मात्र वाखारी पासून पुढे चिंचबारीपर्यंत रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनांचे नुकसान तसेच वारंवार अपघात देखील घडत आहेत. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पवार यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे. तसेच पावसाळ्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसांत चिंचबारी घाट रस्ता वाहून गेला असून त्याची अद्याप दुरुस्ती झाली नाही. यामुळे या घाटात मोठा अपघात व जीवित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकामी लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष घालून वहनधारकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम