Deola | देवळा शहरात प्रदूषण मुक्त भारत मोहिमे अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

0
11
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | भारतीय खेल प्राधिकरण व महाराष्ट्र शासन तसेच देवळा शहरातील कदम क्लासेस यांच्या सौजन्याने रविवारी (दि.22) रोजी सकाळी प्रदूषण मुक्त भारत या मोहिमे अंतर्गत जनजागृती पर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वायू प्रदूषणाच्या भयावह वाढलेल्या पातळीने तसेच हवामान बदलामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम झालेले आढळून येत असल्याने केंद्र सरकार ते राज्य सरकारपर्यंत या प्रदूषण मुक्त भारत मोहिम संपूर्ण भारतभर सक्रिय राबविण्यात येत आहे. या मोहिमेतील पुढील पाऊल म्हणजे नोकरदार वर्ग किंवा सर्वसामान्य आठवड्यामधील सहा दिवस कामात व्यस्त असतात.

परंतु रविवारचा दिवस शारीरिक मानसिक तसेच आरोग्यासाठी वापरावा व हा दिवस शारिरीक व्यायामासाठी ‘संडे ऑन सायकल’ या मोहिमेद्वारे सायकलिंग करून सायकलवर प्रवास करून शक्य असेल तेवढे जवळचे काम हे सायकल चालवूनच करावेत जेणेकरून वायू प्रदूषण, इंधन बचत व आरोग्यासाठी देखील लाभदायी ठरणार आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून शासनाद्वारे ‘संडे ऑन सायकल’ या मोहिमेची आज पासून सुरुवात झालेली आहे. संडे ऑन सायकल पॉल्युशन फ्री इंडिया चे औचित्य साधून देवळा शहरात जनजागृती पर सायकल राईड रॅलीचे उदघाटन डॉ.वसंतराव आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.

Deola | वाखारी ते चिंचबारी रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांमुळे अपघात वाढले

सदर पर्यावरण जनजागृती सायकल राईडमध्ये एकूण 64 विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदविला. यावेळी कदम क्लासेसचे संचालक स्वप्निल कदम, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सायकलींग प्राप्त प्रा. डॉ. लहानु जाधव यांनी या रॅलीचे संपूर्ण आयोजन केले. या कामी आनंद मेडिकलचे कपिल आहेर, प्रवीण गांगुर्डे, संदीप गांगुर्डे यांचे रॅली मोलाचे सहकार्य लाभले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here