Dada Bhuse | नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. मात्र, कांद्यावरील निर्यात शुल्कामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरी आपण केंद्र सरकारकडे शिफारस करून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी विनंती दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे जीवनमान हे कांद्याच्या शेतीवर अवलंबून असून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे. तसेच या शुल्कामुळे परदेशी बाजारपेठांमध्येही कांद्याची मागणी कमी होत आहे आणि निर्यातदारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, स्थानिक बाजारात कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होत असून साध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर हा 1000 ते 2000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा सुटत नाही.
Malegaon | मालेगावमध्ये सर्व्हिसरोड व उड्डाणपुलास मंजूरी द्यावी; दादा भुसेंची मागणी
तरी शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आपण केंद्र सरकारकडे विनंती करून कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क रद्द करण्यासाठी शिफारस करावी अशी विनंती दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम