सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र संस्थेच्या देवळा येथील अभिनव व जनता विद्यालयाचे ‘मविप्र’ सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेत विजयाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी आयोजित सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात एकपात्री नाटिका या स्पर्धा प्रकारात विद्यालयातील विद्यार्थिनी कु. तृप्ती सोमनाथ निकम हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर समूहगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
Deola | देवळा अभिनव व जनता विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा
यात मानसी पवार, प्रणिती साबळे, आरती जाधव, रोशनी सूर्यवंशी, समीक्षा शिंदे, प्रगती चव्हाण, रसिका आहेर, सृष्टी आहेर, क्रांती आहेर, अनुष्का सोनवणे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्ञानेश्वरी बोरसे, वादक रोशन बर्वे आदींनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुका संचालक विजय पगार, स्कूल कमिटीचे अध्यक्ष योगेश आहेर, प्रदीप आहेर, सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक मनिष बोरसे आदींनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम पाटील, शुभांगी बच्छाव, कामिनी वाघ, शैला भामरे, योगिता भामरे, योगिता निकम, शितल बिरारी, आदि सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम