देवळा | तालुक्यातील मांजरवाडी येथे रविवारी (दि.८) पासून दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. याप्रसंगी दत्त मंदिरात रोज पहाटे चार वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत गुरुचरित्र पारायण होईल. तर ८ डिसेंबरपासून ते १४ डिसेंबर पर्यंत रात्री ९ ते ११ सुखदेव मोरे – आडगाव, मच्छिंद्र महाराज – सरोळे खुर्द, अंजली शिंदे – निफाड, सौरभ जाधव – कुंडाने, ऋतुजा पवार – नांदगाव, निवृत्ती रायते – खडक माळेगाव, गोरख कुदळे – आळंदी यांचे कीर्तन होईल. रविवारी दि.१५ रोजी सकाळी ९ वाजता गोरख कुदळे – आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मांजरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
Deola | खर्डे येथे दत्त जयंती निमित्त शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम