द पॉईंट नाऊ ब्युरो : अखेर देवळा शहराला स्वतंत्र पोलीस निरीक्षक म्हणून दिलीप लांडगे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पदभार घेतला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांवर येणारा अतिरिक्त ताण या वास्तव परिस्थिती संदर्भातील वृत्त ‘द पॉईंट नाऊ’ ने प्रसारित केले होते, या वृत्ताची दखल घेत तातडीने नवीन पोलीस निरीक्षक नेमण्यात आले.
प्रभारी म्हणून सटाण्याचे पोलीस निरीक्षक सध्या काम पाहत होते, त्यांना दोन तालुके सांभाळताना मोठी कसरत करावी लागत होती. देवळा नगरपंचायत निवडणूक तसेच उमराणे बाजार समिती निवडणूक हे बघता देवळा तालुक्याला स्वतंत्र पोलिस निरीक्षकाची नितांत गरज होती, या संदर्भात दोन दिवसापूर्वी ‘द पॉईंट नाउ’ने ‘प्रभारींच्या हातात शहराची कायदा सुव्यवस्था’ या शीर्षकाखाली बातमी चालवली यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आश्वासन दिले होते, की दोन दिवसात स्वतंत्र पोलिस निरीक्षक नेमण्यात येईल त्यानुसार नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली व त्यांनी तातडीने पदभार घेऊन कामास सुरुवात देखील केली.
तालुक्यातील पोलिसांचे तोकडे संख्याबळ व त्यांच्या समोरील आव्हाने , समस्या पोटतिडकीने मांडल्या आहेत, शहराची वास्तव परिस्थिती वरिष्ठांना लक्षात आणून दिली त्यामुळे तातडीने शहराला नवीन अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…..
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम