Deola | ‘गावागावातून मिळणारा प्रतिसाद बघता माझा विजय निश्चित’- केदा आहेरांनी व्यक्त केला विश्वास

0
59
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा-चांदवड विधानसभा निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार केदा नाना आहेर यांनी बुधवारी दि. १३ रोजी लोहोणेर जिल्हा परिषद गटाचा प्रचार दौरा केला. या दौऱ्यात गटातील गावागावांत केदा आहेर यांचे महिलांनी औक्षण करत नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Deola | ‘विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे’; देवळ्यातील प्रचार सभेत केदा आहेरांचा विरोधकांना टोला

“जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत”

यावेळी उमेदवार आहेर यांनी बोलताना सांगितले की, “मतदार संघाचे दहा वर्षे वाया गेले असून, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, रस्ते आदी समस्या जैसे थे आहेत, जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत. मतदार संघातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून मला साथ दिली आहे. सर्व जाती धर्मातील जनतेच्या पाठबळावर मी उमेदवारी केली असून, आगामी काळात मतदारसंघात उच्च शिक्षणाबरोबरच, औद्योगिक वसाहत निर्माण करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम आपण उपलब्ध करून देणार आहोत. तालुक्यातील गावागावात मला मिळणारा प्रतिसाद बघता माझा विजय निश्चित असल्याचे याप्रसंगी केदा आहेर यांनी सांगितले.

Deola | “खर्डेकर मतदान कर” असा नारा देत आरोग्य विभागाने खर्डे गावात राबवले मतदान जनजागृती अभियान

लोहोणेर येथे सभा पार पडली

यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्रचे संचालक विजय पगार, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार आदींसह सरपंच, उप सरपंच, विकास सोसायटीचे सभापती, उपसभापती, संचालक आदींसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार दौऱ्यात आहेर यांनी वाखारवाडी, खुंटेवाडी, विजय नगर, फुले माळवाडी, माळवाडी, सरस्वती वाडी, विठेवाडी, झिरे पिंपळ, भऊर, खामखेडा, सावकी, खालप, खडकतळे, रणादेव पाडा, देवपूर पाडा, महाल पाटणे, निबोळा, वासोळपाडा, वासोळ आदी गावांना भेटी दिल्या. सायंकाळी लोहोणेर येथे सभा घेण्यात आली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here