नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सरपंचाचे प्रथम कर्तव्य – पेरे पाटील

0
46
लोहोणेर येथे रूद्रयोग बहुविकास संस्थेच्या वतीने मक्तेदार दिनेश सोनार यांना पुरस्काराने सन्मानित करतांना भास्कर पेरे पाटील समवेत केदा आहेर, विशाल देशमुख आदी

देवळा प्रतिनिधी : गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सरपंचाचे प्रथम कर्तव्य असून यासाठी गावातील नागरिकांना स्वछ पाणी देणं, गावात फळझाडांची लागवड करणे, गाव स्वछ ठवणे आणि गावातील वृद्ध व्यक्तींना जीव लावणं ही जबाबदारी ग्रामपंचायतीने पार पाडणे गरजेचे असून यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत पोटोदा येथील आदर्श गाव प्रणेते भास्करपेरे पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

लोहोणेर येथे रूद्रयोग बहुविकास संस्थेच्या वतीने मक्तेदार दिनेश सोनार यांना पुरस्काराने सन्मानित करतांना भास्कर पेरे पाटील समवेत केदा आहेर, विशाल देशमुख आदी

लोहोणेर येथे बुधवार दि.१५ रोजी रुद्रयोग ग्रामगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आदर्श व्यक्ति व ग्रामनिर्माण या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर तर स्वागताध्यक्ष आ. डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हापरिषदेचे सदस्य यशवंतराव शिरसाठ, डॉ. नुतन आहेर, देवळा पंचायत समिती सदस्य कल्पनाताई देशमुख, सभापती शांताबाई पवार, धर्मा अण्णा देवरे, केशरबाई आहीरे, सरला जाधव, सुरेखा निकम, माजी जि प सदस्य प्रशांत देवरे, राजेंद्र देवरे आदी ,प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन येथील रूद्रयोग बहुविकास संस्थेच्या, देवळा तालुका ग्रामगौरव समितीने केले होते. संस्थेच्या वतीने देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्कृष्ट व आदर्श कामाची दखल घेऊन लोहोणेर व वाजगाव ग्रामपंचायतीस रुद्रयोग ग्रामगौरव पुरस्काराने भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आले. याच बरोबर उद्योग, कृषी, वैद्यकीय, ग्रामसेवक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात आला.

यात प्रामुख्याने उमराणे येथील श्रीमती कमलताई विश्वास देवरे-उत्कृष्ट सरपंच, सिमा रामचंद्र हिरे-उत्कृष्ठ सरपंच,भऊर येथील उपसरपंच योगिता दिनेश पवार-उत्कृष्ठ ग्रामसेवा,लोहोणेर येथील गव्ह. कॉन्ट्रॅ. समाधान राजाराम चव्हाण-उद्योग,वासोळ येथील गिरणा प्रो.कं.चे स्वप्निल पाटील-शेती व उद्योग, ठेंगोडा येथील सामाजिक कार्यकर्ते रवि ठाकरे-ग्रामसेवा, खालप येथील गव्ह. काँट्र.व पत्रकार दिनेश पद्माकर सोनार-उद्योग,खुंटेवाडी येथील ग्रामसेविका पुनम सोनेजे, माळवाडी येथील ग्रामसेवक संभाजी , मटाने येथील ग्रामसेवक अनिल आहेर आदींना सन्मानित करण्यात आले. प्रस्तावित कुबेर जाधव यांनी केले तर आभार विशाल देशमुख यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here