Narhari Zirwal | ‘शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासोबत’; झिरवाळांच्या विधानाने खळबळ

0
49
#image_title

Narhari Zirwal | विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतर काल संध्याकाळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नरहरी झिरवाळांविरोधात आघाडी कोणाला उभं करणार याची उत्सुकता वाढली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे उमेदवार म्हणून आमदार झिरवाळांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून गेल्या निवडणुकीत आमदार झिरवाळांना साथ दिलेले किती नेते त्यांच्यासोबत असतील याविषयी साशंकता आहे.

Narhari Zirwal | ‘अजितदादा म्हणजे फणस’ कौतुकसुमने उधळत झिरवाळांनी दादांसमोर मुलाची बाजू झाकली..?

नरहरी झिरवाळांना महायुतीतूनच आव्हान

अशा परिस्थितीत आमदार झिरवाळ यांना महायुतीतूनच बंडखोरांचे आव्हान असून त्यामुळे झिरवाळ यांची यंदाच्या निवडणुकीत काय स्ट्रॅटर्जी असणार? हे पाहणे उत्सुकतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर आमदार झिरवाळ यांनी “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्या बळावर उमेदवारी करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असले तरीही मला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दुरून आशीर्वाद असतील” असा अजब दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या काही नेत्या आणि पदाधिकाऱ्यांसह आमदार झिरवाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आमदार झिरवाळ सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहेत. यापूर्वी दोन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते.

Narhari Zhirwal | धनगर आरक्षणाला झिरवाळांचा कडाडून विरोध; धनगर-आदिवासी आरक्षण मुद्दा पुन्हा पेटला

इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीकरीता रांगेत

दरम्यान, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आमदार झिरवाळ यांचा पराभव करण्याचा निर्धार माजी आमदार महाले यांनी घेतला असून त्यामुळे आमदार झिरवाळ यांना यंदा महायुतीतूनच मोठे आव्हान असणार आहे. ही महायुतीच्या नेत्यांना बंडखोरी रोखण्यात यश आलेले नाही. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवार जाहीर झालेला नसल्यामुळे पाच इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीकरीता रांगेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला सुद्धा उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार यंदा तिसऱ्यांदा उमेदवारी करत आहेत. आपण शंभर टक्के विजय होऊ असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांचा हा दावा कितपत खरा ठरतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here