द पॉईंट प्रतिनिधी : चिक्की घोटाळ्या प्रकरणी अद्याप गुन्हा का नोंदवला नाही. असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला केला आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात.
युती सरकारच्या काळात बालविकास योजनेंतर्गंत पाच वर्षापूर्वी निकृष्ठ दर्जाची चिक्की वाटण्यात आली होती. भाजपसरकार काळातील या घोटाळ्याची चौकशी पून्हा सुरू होऊ शकते. तसे न्यायालयाने निर्देश दिले असून सरकारला फटकारले आहे. इतका गंभीर विषय असतांना दुर्लक्षित कसा झाला, गुन्हा का नाही असे अनेक प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली आहे.
युती सरकारच्या काळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. ह्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या तत्कालिन मंत्री पंकजा मुंडे होत्या. यावेळी अंतरंग चौकशी केली असता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांना क्लिन चीट दिली होती. यामुळे संशयाचे वातावरण युती सरकार भोवती होते.
निकृष्ट दर्जाचे चिक्की असल्याचे सिद्ध झाले होते. चिक्की वाटपासाठी कोट्यावधी रुपये 24 कंत्राटदारांना दिले होते. मात्र सरकारी प्रयोग शाळेत त्यात वाळू सापडल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याचे याचिकादाराचे आरोप आहेत. येत्या काळात चिक्की घोटाळा पुन्हा गाजण्याची शक्यता आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम