Dindori | स्वाध्याय परिवाराचा आज “मनुष्यगौरवदिन”

0
14
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | एकविसाव्या शतकात असून ही “लेना-देना बंद है | फिर भी आनंद है |” म्हणत कुठल्याही प्रकारे सोशल मीडियाचा वापर न करता आज लाखो स्वाध्यायी भगवंत भक्ती करत, दैवी विचारांचा वारसा माणसा-माणसा पर्यंत पोहचवत आहेत. ज्ञान-कर्म-भक्तीची सांगड घालून माणसातील आत्मगौरव उभा करणाऱ्या वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प. पू. पांडुरंगशास्त्रीजी आठवले (दादाजी) चा आज जन्मदिवस. हा दिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ‘मनुष्यगौरवदिन’ या सार्थ नावाने साजरा करतो.

Dindori | नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत

दादाजींचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी रायगड जिल्ह्यातील रोहे या गावी सरस्वती पूजनाच्या शुभदिनी झाला. वेद व गीता यांच्यातील सदविचार तळागाळातील व्यक्तीपर्यंत कसे पोहचतील या शुभचिंतेतून त्यांनी स्वाध्याय परिवार उभा केला. भगवान कृष्णांनी गीतेत सांगितलेला “सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो |” भगवंत हृदयात आहे. हा भाव दादांनी रुजवून माणसाचा आत्मसन्मान जागृत केला. आपल्यात रक्ताचे नाते नसले तरी आपले रक्त बनविणारा एकच आहे.  हा दैवी भ्रातृभाव-दैवी बंधुभाव रुजवून स्वाध्याय परिवार उभा केला. त्यामुळे स्वाध्यायी एकमेकांना भाऊ-ताई संबोधतात.

दादाजी आपल्या प्रवचनात सांगत भगवंत भक्ती म्हणजे कर्म कांड नाही, तर भक्ती म्हणजे मी भगवंतापासून विभक्तनाही, ही पक्की समजूत. धर्मभक्तीच्या ज्ञानाबरोबरच कृतीभक्तीसाठी दादाजींनी योगेश्वर भावकृषी, मत्स्यगंधा, श्रीदर्शनम, वृक्षमंदिर, अमृतालम असे प्रयोग दिले. या प्रयोगांद्वारे स्वाध्यायी बंधु-भगिनी आपल्या बौद्धिक-शारीरिक निपुणता व कौशल्य प्रभुकार्यासाठी वापरू लागले. कर्मकांड न करता आपण आपले दैनंदिन काम व त्यातील कौशल्य निपुणता भगवंत चरणी अर्पण करण्याचा अनोखा भक्ती मार्ग दादाजींनी दाखवला.

Dindori | जीवन फार सुंदर आहे त्याचा योग्य आनंद घेतला पाहिजे – पो. नि. रघुनाथ शेगर

१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसऱ्या धार्मिक परिषदेत दादाजींनी वेद आणि गीतेतील तत्वज्ञानावावर भाषण केले. प्रसिद्धी पासून कोसो दूर असणाऱ्या व शांतपणे चाललेल्या दादांच्या मनुष्यगौरव कार्याची दखल घेत त्यांना पद्यविभूषण (१९९९), मॅगसेसे ॲवॉर्ड फॉर कम्युनिटी लीडरशीप (१९९६), नोबेल प्राईझच्या तोडीचा ‘टेंपलटन प्राईझ फॉर प्रोग्रेस इन रिलिजन’ (१९९८) या प्रतिष्ठित पुरस्कारानंबरोबरच इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार (१९८७), महात्मा गांधी पुरस्कार (१९८८), लोकमान्य टिळक पुरस्कार (१९९२) नी सन्मानित करण्यात आले. सौराष्ट्र व सरदार पटेल विद्यापीठ यांनी सर्वोच्च शैक्षणिक डि.लिट. पदवी दादाजींना देऊन त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here