Assembly Election | राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया बंदोबस्त व कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी बाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याकरिता 20 विषयांची निवड करून ई-शिक्षणाद्वारे पोलिसांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सलग चार दिवस डॉ. भीष्मराज बाम सभागृहात हे प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशिक्षण सत्राचे नियोजन
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रशिक्षण सत्राचे नियोजन केले असून त्यानुसार नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक तुषार आढाव, सरकारवाडा निरीक्षक समाधान चव्हाण, नाशिक रोडचे निरीक्षक बडेसाब नाईकवाडे हे तिघे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. त्यामध्ये सर्व पोलीस ठाणे वाहतूक गुन्हे शाखा, तांत्रिक विश्लेषण, अभिनव कक्ष, दंगल नियंत्रण पथक, मोटार परिवहन, जलद प्रतिसाद पथक, नियंत्रण कक्ष, अंगुली मुद्रा यासह इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
Nashik News | “उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे”-जिल्हाधिकारी जलज शर्मा
आचारसंहिता कालावधीतील कार्यवाही याबाबत मार्गदर्शन
या प्रत्येक सत्रात सुमारे 250 अधिकारी कर्मचारी सहभागी होणार असून पुढील 4 दिवसांमध्ये 3000 पोलिसांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यातील केंद्रीय निवडणूक व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना नियम बंदोबस्त व कार्यपद्धती तसेच आचारसंहिता कालावधीतील कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदारी वाटप करून निवडणुकीच्या दृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम